सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्री. प्रशांत स्नेहलता काशिनाथ पाटकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
· आस्थापना विषयक कामकाज उदा.नियुक्ती, पदोन्नती, बदली, रजा इ. सर्व पंचायत समिती कर्मचा-यांबाबत
· निवड मंडळाचे कामकाज
· नियोजन व समन्वय
· प्रशिक्षण
· राज शिष्टाचार
· वार्षिक प्रशासन अहवाल
· पंचायत समिती सर्वसाधारण व स्थायी समिती सभा कामकाज
वित्त विभाग (Fianance Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्री. सदाशिव सुचिता गणेश सावंत, सहा. लेखाधिकारी
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
वित्त विभागाची उद्यिष्टे (Objectives of Finance Department)
1. प्रलंबित परिच्छेदांचे 100% अनुपालन सादर करुन वर्षाअखेर 80% परिच्छेद निकाली काढणे.
2. निवृत्तीवेतन/अंशदान/उपदान प्रदान करणे.
3. प्राथमिक लेखापरिक्षक म्हणून काम करणे.
4. प्राप्त निधीचे आणि खर्चाचे लेखे ठेवणे.
5. पंचायत समितीच्या वतीने जमा रक्कमा/ निधी स्वीकारणे व सर्व रक्क्मांचे प्रदाने अदा करणे.
वित्त विभागाची मुलतत्वे (Principles of Finnance Department):-
वित्त विभाग हा पंचायात समितीतील कार्यप्रणालीचा प्रमुख कणा असून या विभागाची प्रमुख मुलतत्वे पुढील प्रमाणे आहेत.
1. पंचायत समितीचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करणे.
2. प्राथमिक लेखापरिक्षक म्हणून काम पाहणे.
3. प्राप्त निधीचे आणि खर्चाचे लेखे ठेवणे.
4. पंचायत समितीच्यावतीने जमा रक्कमा/निधी स्विकारणे व सर्व रक्कमाचे प्रदान करणे.
2. नागरिकांची सनद:-
वित्त विभाग, पंचायत समिती दोडामार्ग
नागरिकांची सनद
अ.क्र | सेवांचा तपशिल | सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा |
1 | देयके स्विकारून मंजूर करणे | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | सहाय्यक लेखाधिकारी |
2 | खरेदी व लेखाविषयक संचीकावर कार्यवाही करणे | वरिष्ठ सहाय्यक (लेखा)/ कनिष्ठ लेखाधिकारी | गट विकास अधिकारी |
3 | पंचायत समिती अर्थसंकल्पाशी निगडीत कामकाज पार पाडणे, व वित्त विभागांशी (जिल्हा परिषद सिेंधुदुर्ग) संबंधित पत्रव्यवहार व वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर प्रासंगिक कामे पार पाडणे. हस्तांतरीत, अभिकरण, जि.प. उपकर व विषेश निधी अंवर्गत वेतन व वेतनेत्तर विभाग निहाय लेखाशिर्षाचे पंचायत समिती स्तरावर देयके खर्च टाकने व संबंधिताना प्रदान करणे. | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | सहाय्यक लेखाधिकारी |
4 | संकलन शाखा प्रमुख, नमुना नंबर 19 व 20 मध्ये जमा-खर्चाची प्राप्त आकडेवारी संकलीत करणे. व स्थानिक लेखा परिक्षणाचे आक्षेप व महालेखाकार आक्षेप परिच्छेदांचे अनुपालन सादर करणे. वेळोवेळी कार्यालयाने आदेशीत केलेली कामे पार पाडणे. | वरिष्ठ सहाय्यक (लेखा)/ कनिष्ठ लेखाधिकारी | सहाय्यक लेखाधिकारी
|
5 | सेवा निवृत्ती व कुटुंब निवृत्ती प्रकरणाबाबत मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडील प्राप्त आदेशानुसार प्रदानाची कार्यवाही करणे. | कनिष्ठ सहाय्यक (पेन्शन) | सहाय्यक लेखाधिकारी |
6 | हस्तांतरीत योजना/अभिकरण योजना/जि. प. सेस/पं. स सेस/पंधरावा वित्त आयोग, निधी देयकाचे धनादेश तयार करून वितरीत करणे. | वरिष्ठ सहाय्यक (लेखा)/ कनिष्ठ लेखाधिकारी | सहाय्यक लेखाधिकारी
|
7 | अंतर्गत लेखा परिक्षण करणे. | कनिष्ठ लेखाधिकारी | सहाय्यक लेखाधिकारी |
8 | स्थानिक निधी लेखा कार्यालयाचा सर्व कार्यभार, विभागीय आयुक्त तपासणी मुद्दे. | कनिष्ठ लेखाधिकारी | सहाय्यक लेखाधिकारी |
9 | वेतन पडताळणी | कनिष्ठ लेखाधिकारी | सहाय्यक लेखाधिकारी |
10 | आश्वासित प्रगती योजना संचिका भार अधिभार व अफरातफरीची प्रकरणे, भांडार पडताळणी, महालेखाकार कार्यालयातील आक्षेप. | कनिष्ठ लेखाधिकारी | सहाय्यक लेखाधिकारी |
ग्रामपंचायत विभाग (Panchayat Department)
दोडामार्ग तालुक्यामध्ये ३६ ग्रामपंचायत आहेत व सदर ३६ ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ग्रामसेवकांची २७ पदे मंजूर असून २१ ग्रामसेवक कार्यरत आहेत. तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) यांची १ पदे मंजूर असून १ विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत.
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्री. श्रीरंग बबुताई अशोक जाधव, विस्तार अधिकारी पंचायत
कार्यक्षेत्र – दोडामार्ग तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती.
संक्षिप्त कार्ये – टेबलनिहाय नेमून दिलेली कामे संलग्न केलेले सुचीप्रमाणे.
विभागाचे ध्येय धोरण :
· तालुक्यातील ग्रामिण भागाचा विकास, शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना राबविणे.
· तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सनियंत्रण करणे.
ग्रामपंचायती -
अ. क्रं. | ग्रामपंचायतीचे नांव | अ. क्रं. | ग्रामपंचायतीचे नांव | अ. क्रं. | ग्रामपंचायतीचे नांव |
1 | झोंळबे | 13 | झरेबांबर | 25 | कळणे |
2 | तळकट | 14 | मांगेली | 26 | आयी |
3 | विर्डी | 15 | तेरवणमेढे | 27 | कुंब्रल |
4 | माटणे | 16 | घोटगे | 28 | आंबडगाव |
5 | वझरे | 17 | परमे | 29 | खोक्रल |
6 | कोनाळ | 18 | आडाळी | 30 | कोलझर |
7 | पाटये पूनर्वसन | 19 | मोरगाव | 31 | बोडदे |
8 | सासोली | 20 | कुडासे खुर्द | 32 | बोडण |
9 | केर | 21 | झरे 2 | 33 | मणेरी |
10 | मार्लै | 22 | तळेखोल | 34 | फुकेरी |
11 | हेवाळे | 23 | उसप | 35 | कुडासे |
12 | साटेली भेडशी | 24 | पिकूळे | 36 | घोटगेवाडी |
आरोग्य विभाग (Health Department)
स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. १९९७ साली झालेल्या १३ व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच २००० साली ‘सर्वांना आरोग्य’ या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकृत करण्यात आले.
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – तालुका आरोग्य अधिकारी
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
· ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविणे.
· शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे.
· लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी करणे व तसेच माता व अर्भक मृत्युदर कमी करणे.
· संसर्गजन्य रोग व साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणे.
तालुक्यातील सरकारी दवाखाने :
उपजिल्हा रुग्णालय –
ग्रामीण रुग्णालये –
प्राथमिक रुग्णालये –
आरोग्य उपकेंद्रे -
आयुर्वेदिक रुग्णालय-
कात्मिक बालविकास सेवा योजना विभाग (Integrated Child Development Service Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्रीमती. तारका बाळाजी साटम, बालविकास प्रकल्प अधिकारी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी..?
· देशाच्या मानवी साधनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी.
· कोवळ्या बालवयातच, मुलांच्या शरीराच्या, मनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या विकासाचा भरभक्कम पाया घालण्यासाठी.
· बालमृत्यू, शारीरीक अपंगत्व, कुपोषण, शाळाशिक्षणात प्रगती असूनही शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची परिस्थीती आणि विकसनक्षमतेची प्रतिकूलता यांच्यामुळे उद्भवणारा अपव्यय टाळण्यासाठी, आणि
· बाल विकासाच्या क्षेत्रामध्ये जनतेचा सामूहिक सहभाग लाभावा आणि बाल विकासाच्या कार्यक्रमाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यादृष्टीने चालना देण्यासाठी.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश :
· 0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
· मुलांचा योग्य मानसिक, शाररिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे
बालमृत्यूचे, बालरोगाचे, कुपोषणाचे व मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
· बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभांगांमध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
· योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढविणे.
अ) एकात्मिक बाल विकास विभाग :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत खालील प्रमाणे लाभधारकांना सेवा देण्यात येतात.
1) पुरक पोषण आहार वाटप:-
06महिने ते 06 वर्ष वयोगटातील मुले, गरोदर स्त्रिया , स्तनदा माता यांना केंद्र शासनाचे मार्गदर्शक तत्वानुसार पुरक पोषण आहार वांटप वर्षातुन 300 दिवस करणेत येते. सदर पोषण आहारात तांदुळ व मुगडाळ यांची खिचडी, मटकी,मुग,चवळी,चणा, वाटाणा इ. कडधान्याची उसळ यांचा समावेश आहे.
2) आरोग्य तपासणी :-
0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांची प्रा.आ. केंद्रातील वैद्यकिय अधिकारी तसेच बालरोग तज्ञ यांचे कडुन जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी केली जाते. सदर तपासणीचे अहवालानुसार संदर्भ सेवा देऊन कार्यवाही केली जाते.
3) रोग प्रतिबंधक लसीकरण :-
0 ते 06 वर्ष वयोगटातील मुले ,गरोदर स्त्रिया यांना बीसीजी, पोलििओ, डिपीटी, गोवर इ. रोग प्रतिबंधक लसीकरण विहीत पध्दती व कालमानानुसार केले जाते.
4) पोषण व आरोग्य शिक्षण :-
15 ते 45 वर्ष वयोगटातील महिलांना पोषण व आरोग्य विषयक प्राथमिक स्वरुपाचे शिक्षण दिले जाते.
5) शालेय पुर्व शिक्षण :-
03 ते 06 वर्ष वयोगटातील मुलांना अंगणवाडी केंद्रांमधुन अंगणवाडी सेविका यांचे मार्फत विविध चित्रांची ओळख, रंग, अक्षरे, बडबडगीते, बालक्रिडा, खाण्याच्या व राहाण्याच्या सवयी, इ.. शालेय पुर्व शिक्षण दिले जाते.
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
ब) महिला बाल विकास विभाग :- महाराष्ट्र शासन,ग्राम विकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्रं.झेडपीए 1007/454/प्र.क्र.51/पं.रा-1 मंत्रालय,मुंबई दि.19 डिसेंबर 2007 अन्वये जि.प. च्या महिला व बाल कल्याण समिती मार्फत राबवावयाच्या एकुण 21 योजना देणेत आलेल्या आहेत. तथापि, या जिल्हयाची भौगोलिक परिस्थिती तसेच लाभार्थीची उपलब्धता विचारात घेऊन सदर योजनांपैकी खालील प्रमाणे योजना राबविण्यात येतात. 1. ग्रामीण भागातील आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या स्त्रियांसाठी मोफत शिलाई मशिन :- 1) अर्जदार ग्रामीण भागातील असणे आवश्यक. 2) अर्ज विहित नमुन्यात असावा. 3) अर्जदार दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील असावा किंवा वार्षिक उत्पन्न 20,000/-पेक्षा कमी असलेबाबत तहसिलदार यांचा दाखला जोडावा. 4) रेशन कार्डाची सत्य प्रत. 5) मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला. 6) शिवणकामाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे शासकीय /नोंदणीकृत संस्थेचे/ट्रायसेम योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. 7) लाभार्थी हिस्सा 10% भरणेस तयार असलेबाबतचे हमीपत्र आवश्यक. 8) यापूर्वी कोणत्याही विभागाकडून रु.500/-स्वयंरोजगाराचे अनुदान/शिलाई मशिन/घरघंटी या योजनेचा लाभ न घेतलेबाबत ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला 2. शाळेत जाणा-या मुलींना सायकली पुरविणे :- 1)लांबपल्याच्या 2 कि. मी. अंतरावरील शाळेत जाणा-या इ.5 वी ते 9 वी पर्यंत शिकणा-या मुलींना सायकली पुरविणे. 2) अर्जदार ग्रामीण भागातील असणे आवश्यक. 3)अर्ज विहीत नमुन्यात असावा. 4) अर्जदार दारिद्रय रेषेखालील कुटंुबातील असावा किंवा वार्षिक उत्पन्न 20,000/- पेक्षा कमी असलेबाबत तहसिलदार यांचा दाखला जोडावा. 5) रेशन कार्डाची सत्य प्रत. 6) मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला. 7) मुख्याध्यापकांचा दाखला. 8). लाभार्थी हिस्सा 10 टक्के भरणेस तयार असलेबाबतचे हमीपत्र आवश्यक. 9) यापुर्वी कोणत्याही विभागाकडून सायकल योजनेचा लाभ न घेतलेबाबत ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला. 3. शाळा सोडलेल्या मुली व महिलांना तांत्रिक प्रशिक्षणासाठी मदत:- 1)व्यावसायीक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन देणे,नर्सिंग/पॅकिंग/टेलिफोन ऑपरेटर/आयटीआय इ.प्रशिक्षण) लाभार्थी दारिद्रयरेषेखालील असावा. 2) ्रशिक्षण घेणारे लाभार्थी 10 वी पर्यत शिक्षण इ. झालेली असावी. 3) प्रशिक्षणार्थी ज्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत आहे ती संस्था सरकारमान्य असली पाहिजे. 4) प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दरमहा रु.100/-विद्यावेतन देण्यात येते. 5) दुस-या संस्थेमार्फत विद्यावेतन मिळत नसलेबाबत लाभार्थीने हमीपत्र अर्जासोबत जोडावे. 6) प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षणासाठी जो अभ्यासक्रम निवडलेला आहे तो देखील उपरोक्त संस्थेने मान्य केलेला असला पाहिजे. 7) महाराष्ट्रातील 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला अर्जासोबत जोडावा. 8) विहित नमुन्यात अर्ज. 9) यापूर्वी लाभार्थीने कोणत्याही विभागाकडून या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबत ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला. महिला लोक प्रतिनिधींचा प्रशिक्षण/अभ्यास दौरा :- प्रति लाभार्थी रक्कम रुपये 2,000/- प्रमाणे महिला लोक प्रतिनिधी यांचा प्रशिक्षण/ अभ्यास वर्षातुन एक वेळा दौरा सहल आयेजित करावयाची आहे. 4. महिला लोक प्रतिनिधींचा प्रशिक्षण/अभ्यास दौरा:- (खादयपदार्थ तयार करणे,मण्याच्या वस्तू तयार करणे,भाजीपाला विक्री ) विशेष घटक योजना व सर्वसाधारण या दोन लेखाशिर्षाखाली अनुदान खर्च केले जाते:- 1)अर्जदार निराधार परितक्त्या,विधवा किंवा नैतीक संकटात सापडलेल्या महिला किंवा आर्थिकदृष्टया मागासलेली असावी. 2) लाभार्थी व्यवसाय सुरु करण्यासाठी स्थानिक संस्थेने दिलेला परवानाधारक असावा. 3) लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा. 4) महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षापेक्षा जास्त असावे.दाखला जोडावा. 5) विधवा महिलांच्या बाबतीत पती निधनाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. 6) विहित नमुन्यात अर्ज. 7) प्रति लाभार्थीला रक्कम रुपये 500/- अनुदान दिले जाते. 5. स्वयंरोजगारसाठी स्त्रियांना व्यक्तीगत अनुदान -: लाभार्थीला 2000/- रुपये विवाह अनुदान मिळते. विवाह झालेनंतर 90 दिवसांचे आत महिला बाल विकास विभागाकडे प्रस्ताव सादर करणेचा असून प्रस्तावा सोबत मुलीच्या वयाचा दाखला प्रस्तावा सोबत जोडावा. लग्नातील फोटो,लग्नपत्रिका,प्रतिष्ठित व्यक्तीचे ओळखपत्र,पती निधनाचा दाखला,महाराष्ट्रातील वास्तव्य दाखला,रेशनकार्ड झेरॉक्स.विवाहनोंदणी दाखला,दारिद्रय रेषेचा दाखला अथवा उत्पन्नाचा तहसिलदार यांचे स्वाक्षरीचा दाखला.विधवा किंवा निराश्रीत असलेबाबतचा दाखला असणे आवश्यक आहे. 6. निराधार विधवांच्या मुलींच्या विवाहासाठी अनुदान:- या योजनेमध्ये मुलींना कुंग्फू-कराटे,योगाचे प्रशिक्षण देण्यात यावे.कोणत्याही वयोगटातील परंतू आर्थिकदृष्टया मागासलेल्या कुटूंबातील मुलींना सदर प्रशिक्षण मोफत देण्यात येते.सदर प्रशिक्षण किमान तीन महिन्यांचे असते.ते शाळा व महाविदयालये यांच्या समन्वयाने आयोजीत करण्यात येते.या योजनेतून प्रशिक्षकाच्या मानधनावर साधारणपणे प्रति लाभार्थी रु.300/- प्रतिमहापर्यत खर्च करण्यात येतो. 7. मुलींना स्वसरंक्षणासाठी व त्यांच्या शारीरीक विकासासाठी प्रशिक्षण देणे (कुंग्फू कराटे पशिक्षण देणे):- या योजनेमध्ये मुलींना कुंग्फू-कराटे,योगाचे प्रशिक्षण देण्यात यावे.कोणत्याही वयोगटातील परंतू आर्थिकदृष्टया मागासलेल्या कुटूंबातील मुलींना सदर प्रशिक्षण मोफत देण्यात येते.सदर प्रशिक्षण किमान तीन महिन्यांचे असते.ते शाळा व महाविदयालये यांच्या समन्वयाने आयोजीत करण्यात येते.या योजनेतून प्रशिक्षकाच्या मानधनावर साधारणपणे प्रति लाभार्थी रु.300/- प्रतिमहापर्यत खर्च करण्यात येतो. 8. देवदासी निर्वाहभत्ता अनुदान:- शासनमान्य मंजूर देवदासी लाभार्थी देवदासींना दरमहा 500/- प्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातो. 9. किशोरवयीन मुलींना व मुलांना जीवनकौशल्याचे प्रशिक्षण देणे:- किशोरवयीन मुलांना व मुलींना शाळेत सर्वसाधारण शिक्षण देण्यात येते .परंतू विशिष्ट किशोरवयीन समस्यांबददल शिक्षण देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना काही मानसिक व सामाजिक,मनोवैज्ञानिक अडचणींना तोंड द्यावे लागते .याबाबत अनुभवी व संवेदनशील तज्ञ/स्वयंसेवी संस्थांमार्फत सदर प्रशिक्षण आयोजीत करण्यात येते. त्याचे स्वरुप स्थानिक आवश्यकतेनुसार ठरविण्यात येते.उदा.शाळेत /महाविद्यालयात शिकणा-या मुलींसाठी किंवा गळती झालेल्या मुलींसाठी दर आठवडयाला एक वर्ग तसेच मुलांसाठी स्वतंत्र वर्ग भरविण्यात येतात. प्रत्येक वर्ग 1 ते 2 तासांचा असतो.बाहेरील तज्ञांना व डॅाक्टरना, मनोवैज्ञानिकांना सदर सत्र घेण्यासाठी निमंत्रित कण्यात येते.त्यांना प्रत्येक सत्रासाठी साधारणपणे रु. 200 ते 400 मानधन देण्यात येते. 10. अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना आदर्श पुरस्कार देणे:- अंगणवाडी मध्ये उत्कृष्ठ काम करणा-या अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना दरवर्षी आदर्श पुरस्कार देवून येतात.पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र,पदचिन्ह,व अंगणवाडी सेविकांना 1000/- व मदतनिसांना 500/-रु. याप्रमाणे पुरस्काराच्या स्वरुपात देण्यात येते.
11.अंगणवाडयांना गरजेनुरुप साहित्य पुरविणे- :- 1)लेखन साहित्य व रजिस्टर पुरविणे. 2) टेबल व खुर्च्या पुरविणे. 3)अंगणवाडीतील मुलांना बस्करपटटया पुरविणे. 12. महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे:- जिल्हा परिषदेमध्ये या केंद्रा मार्फत महिलांचा खालील समस्येबाबत मार्गदर्शन व सल्ला दिला जातो.कौटुंबिक सल्ला, महिलांवर होणारे अत्याचार महिलांना घरातून बाहेर काढण्याची धमकी, महिलांना मारहाण करणे, घटस्फोटासाठी दबाव आणणे, पोटगी प्रकरणे मालमत्ता हक्क, लैंगिक छळवणूक, इत्यादीबाबत या केंद्रामार्फत एकत्रित सभा घेवून तडजोडी घडवून प्रकरणांचा निपटारा केला जातो अशा प्रकारची समुपदेश केंद्रे सर्व गट विकास अधिकारी यांचे कार्यालयात सुरु करुन महिलांवरील अत्याचारावरील निरंककरण करणे बाबत जिल्हा परिषदेचे प्रयत्न आहेत त्यामुळे ग्रामणि व शहरी भागातील अनेक महिलांना एक हक्काचा आधार मिळाला आहे. 13. कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार:-
|
ग्रामीण /आदिवासी भागातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.ते प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषित मुलांना अंगणवाडयांमार्फत दुप्पट आहार दिला जातो.तथापि कुपोषण कमी करण्यासाठी
तो पुरेसा नसल्याने कुपोषित मुलांना अंगणवाडीत पुरविण्यात येणा-या आहाराव्यतिरिक्त विशेष आहार म्हणून स्थानिक उपलब्धतेनुसार दूध,अंडी,फळे,गूळ,शेंगदाणे,इ,वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा.
समाज कल्याण विभाग (Social Welfare Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्री. यशवंत द्रौपदी भिवा गवस, सहा. गट विकास अधिकारी
श्री. नितीन मंगला यशवंत आरोंदेकर, अधीक्षक योजना
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
· ग्रामीण भागातील मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्या देणे.
· अनुदानित वसतिगृहांना अनुदान देणे व दलित वस्तीत सुधार योजना राबविणे.
· अपंगाच्या व सर्व प्रवर्गातील व्यक्तींना पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य देणे, विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत व निवासी शाळा ई. चा लाभ देणे.
कृषि विभाग (Agriculture Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – श्री. निलेश मंदाकिनी वसंत जाधव, कृषी अधिकारी
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
· शासनाच्या विविध प्रचलित योजना अंतर्गत सुधारित कृषि अवजारे, स्वयंचलित अवजारे ट्रॅक्टरचलीत अवजारे, पिक संरक्षण अवजारे, कीटकनाशके, जिवाणू संवर्धन पाकिटे व जीप्सम अनुदानावर वाटप करणे.
· अनुदानावर बायोगॅस सयंत्र उभारणी करणे.
· अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व इतर बाबींचा अनुदानावर लाभ देणे.
गुणनियंत्रण
शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. विक्रीस उपलब्ध करून देणेसाठी गुणनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून कामकाज पाहतात.
बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी : –
· बियाणे मान्यताप्राप्त, परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करावीत.
· सिलबंद पिशवीतील बियाणे घ्यावीत.
· सुटे बियाणे खरेदी करू नये.
· प्रमाणित बियाणे खरेदी करावी.
· पिशवीच्या टॅगवर बियाण्याची क्षमता व प्रमाणित मोहोर असावी.
· बियाणे / रासायनिक खते / कीटकनाशके मुदतबाह्य झालेले नाहीत यांची खात्री करावी.
· संबंधित विक्रेत्याकडून छापील पावती घ्यावी व त्यावर बॅचचा लॅट नंबर नमूद असावा.
· दुकानदाराची पावतीच्या प्रतीवर स्वाक्षरी घ्यावी.
· बियाणे पेरते वेळी पिशवी खालून फाडावी आणि पिशवीसह थोडे बियाणे व लेबल जपून ठेवावी. याचा उपयोग बियाणाची उगवण न झाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी होईल.
बियाणे उगवणे बाबत तक्रार असलेस तत्काळ बियाणे पिशवीसह तालुका कृषी अधिकारी / कृषी अधिकारी , पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी.
पशू संवर्धन विभाग (Animal Husbandary Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम -
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
· ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांच्या पशूंना आरोग्य सेवा पुरविणे
· देशी गाईंना विदेशी बीजे वापरून कृत्रिम रेतन करून सुधारित संकणीकरण करून दुग्धोत्पादन वाढविणे
· पशुंचे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करणे, बेरड वळूंचे खच्चीकरण करून अनावश्यक पैदास टाळणे, गावठी गाईमध्ये वंध्यत्व निवारण करणे.
बांधकाम विभाग (Works Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – उपअभियंता
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
· पंचायत समिती अंतर्गत रस्ते, इमारती व पुलाचे बांधकाम करणे व देखभाल दुरुस्ती करणे.
· पंचायत समिती मधील इतर विभागाची (आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण ई.) मागणी नुसार बांधकामे करणे.
· प.स मार्फत करणेत येणाऱ्या सर्व बांधकामे स्पेसिफिकेशन प्रमाणे करून घेनेची जबाबदारी या कार्यालायची आहे. तसेच अंदाजपत्रक तयार करणे व ५ लाखापर्यंतच्या कामाना तांत्रिक मंजुरी देणे इत्यादी कामे केली जातात.
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग दोडामार्ग (Works Department)
खाते प्रमुखाचे नाव व पदनाम – उपअभियंता
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :